मित्रराष्ट्रांनी झिडकारलेले पाकिस्तान मदतीसाठी आयएमएफच्या दारात 

इस्लामाबाद (पाकिस्तान): मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले पाकिस्तान मदतीसाठी आयएमएफ-आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दारी जाणार आहे. मदतीची मागणी केलेल्या मित्रराष्ट्रांनी झिडकारल्यामुळे नाइलाजाने पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर हात पसरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी संमती दिल्याची माहिती पाकिस्तानचे अर्थ मंत्री उमर असद यांनी दिली आहे.

प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन आणि जेष्ठ अर्थशास्त्र्यांशी सल्लामसलत करूनच मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे उमर असद यांनी एका व्हिडियो संदेशात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे 6-7 अब्ज डॉलर्सची मदत मागण्याची शक्‍यता आहे. मित्रराष्ट्रांनी झिडकारल्या मुळेच पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दारी जाण्याची वेळ आली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मदतीसाठी पंतप्रधान इम्रान खान स्वत: सौदी अरबकडे गेले होते.

-Ads-

1980 पासून पाकिस्तानला 12 वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत पॅकेजची गरज पडली आहे. सन 2013 मध्ये आयएमएफने पाकिस्तानला 6.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. मात्र पाकिस्तानने मदत पॅकेजसाठी संपर्क केला नसल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)