काश्‍मिरातील धास्तावलेल्या दहशतवाद्यांनी मागितली पाक लष्कराची मदत 

file photo

इस्लामाबाद  – काश्‍मिरातील दहशतवाद्यांनी पाक लष्कराची मदत मागितली आहे. काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराने चालवलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमुळे धास्तावलेल्या पाक-पुरस्कृत दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराची मदत मागितल्याची माहिती मीडियाने दिली आहे. पाकव्याप्त काश्‍मीरची राजधानी मुजफ्फराबादच्या सेंट्रल प्रेस क्‍लबमध्ये दहशतवादी संघटनांच्या नेत्यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत यूजेसी (युनायटेड जिहाद कौन्सिल) चा म्होरक्‍या सैयद सलाहुद्दीन सहभागी झाला होता. त्यानेच पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाकिस्तानने लष्करी मदत करावी अशी मागणी केली.

यूजेसी ही सुमारे एक डझन दहशतवादी गटांची संघटना असून सैयद सलाहुद्दीनचा हिजबूल मुजाहिदीन संघटनेचा सर्वात मोठा घटक आहे.हे सर्व दहशतवादी गट भारतविरोधी कारवायांमध्ये सामील आहेत.
या वर्षी ऑपरेशन ऑल आऊटद्वारा भारतीय लष्कराने हिजबूल मुजाहिदीनच्या कमांडरांसह 204 दहशतवादी मारले आहेत. सैयद सलाहुद्दीन भारतीय लष्कराच्या या कठोर कारवाईचा उल्लेख करून पाक लष्कराच्या मदतीची मागणे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)