#ICCWorldCup2019 : ऑस्ट्रेलियाविरूध्द आज पाकिस्तानची खडतर परीक्षा

स्थळ- कौंटी मैदान, टॉंटन
वेळ- दुपारी 3 वाजता.

टॉंटन – ऑस्ट्रेलियाविरूध्दची निराशाजनक कामगिरीची मालिका खंडित करण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना खडतर परिक्षेस सामोरे जावे लागणार आहे. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत आज येथे होणाऱ्या या लढतीत चुरशीची अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियाविरूध्द पाकिस्तानने गेल्या चौदा सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. जानेवरी 2017 मध्ये झालेल्या लढतीत त्यांनी विजय मिळविला होता. या सामन्यात त्यांच्या मोहम्मद हफीझ याने शैलीदार खेळ करीत सिंहाचा वाटा उचलला होता. आजही त्याच्यावर पाकिस्तानची मोठी भिस्त आहे. यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत पाकिस्तानने इंग्लंड संघावर सनसनाटी विजय मिळविला असून त्या विजयातही मोहम्मद हफीझ याने केलेल्या तडाखेबाज खेळाचा महत्वाचा वाटा होता.

भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत क्रिकेट पंडितांनाही चकित केले आहे. या लढतीमध्ये सर्वच आघाड्यांवर भारताची कामगिरी सरस झाली होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांमधील उणीवा या सामन्यात प्रकर्षाने दिसून आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची मुख्य मदार डेव्हिड वॉर्नर याच्यावर असणार आहे. त्याने यंदाच्या या स्पर्धेत दोन अर्धशतके टोलविली असली तरीही त्याच्याकडून त्यांना शतकाची अपेक्षा आहे.

भारताविरूध्दच्या सामन्यात 56 धावा काढताना त्याला 84 चेंडू मोजावे लागले होते. ही त्याच्यासाठी काळजी करणारीच गोष्ट आहे. वॉर्नर याच्याबरोबरच स्टीव्ह स्मिथ, नॅथन कोल्टिअर नील, कर्णधार ऍरोन फिंच, उस्मान ख्वाजा, अलेक्‍स केरी यांच्याकडूनही ऑस्ट्रेलियास आक्रमक खेळाची आशा आहे. गोलंदाजांपैकी मिचेल स्टार्क याचा अपावाद वगळता अन्य गोलंदाजांना क्षमतेइतका प्रभाव दाखविता आलेला नाही. पाकिस्तान संघात शेवटच्या फळीतही आक्रमक फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत. त्याबाबत कांगारूंच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला पाहिजे.

प्रतिस्पर्धी संघ –

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, ऍलेक्‍स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लायन, ग्लेन मॅक्‍सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, ऍडम झम्पा.

पाकिस्तान – सर्फराझ अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)