नव्या पाकिस्तानच्या जुन्या कुरापती सुरूच! म्हणे काश्मिरात मानवाधिकारांचे उल्लंघन 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेक कार्यक्रमांमधून त्यांच्या कारकिर्दीतील पाकिस्तान हा ‘नवा पाकिस्तान’ असल्याचे दावे केले आहेत. परंतु इम्रान खान दावा करत असलेल्या या नव्या पाकिस्तानमध्ये देखील जुन्या पाकिस्तानप्रमाणेच भारताची खोड काढण्याची सवय अबाधित राहिल्याचे दिसत आहे. दहशतवादाला देशामध्ये राजाश्रय देत स्वतःच्याच घरामध्ये आग लावून घेतलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताची खोड काढण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅचेल यांना एक पत्र लिहिले असून यामध्ये त्यांनी भारतामध्ये काश्मिरी लोकांच्या मानवाधिकारांची पायमल्ली होत असल्याचे म्हंटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत बोलताना शाह मोहम्मद कुरेशी म्हणतात की आपण आज संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्तांना लिहिलेले हे पत्र आपल्या डिसेंबर २०१८ मध्ये लिहिलेल्या पत्राचा पाठपुरवठा असून यामध्ये आपण भारतामध्ये काश्मिरी लोकांच्या मानवाधिकारांची पायमल्ली होत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वतःच्या देशामध्ये घडोघडी मानवाधिकारांचे उल्लंघन होत असतानाच भारतासारख्या सार्वभौम देशावर आरोप करण्याची शाह मोहम्मद कुरेशी यांची कृती अतिशय निंदनीय असून पाकिस्तानच्या कुरापती चांगल्याने ओळखून असलेले संयुक्त राष्ट्र पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या या पत्राला केराची टोपली दाखविण्याची शक्यता अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)