#PAK_v_NZ T20I series : पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 2 धावांनी विजय

अबूधाबी – पाकिस्तान विरूध्द न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान संघाने जिंकला आहे. पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा 2 धावांनी पराभव केला.

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 148 धावा केल्या. पाकिस्तानकडून फलंदाजीत मोहम्मद हाफीज याने सर्वाधिक 45 तर सरफराज अहमद याने 34 आणि आसिफ अलीने 24 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयासाठी 149 धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघास 20 षटकांमध्ये 6 बाद 146 धावांच काढता आल्या. न्यूझीलंडकडून फलंदाजीमध्ये काॅलिन मुनरो याने सर्वाधिक 58 तर राॅस टेलर याने नाबाद 42 धावा काढल्या, तरीही पाकिस्तानच्या शानदार गोलंदाजीमुळे न्यूझीलंड संघास 2 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

पाकिस्तानकडून गोलंदाजीमध्ये हसन अली याने 4 षटकांत 35 धावा देत 3 बळी घेतले. तर इमाद वसीम आणि शादाब खानने प्रत्येकी 1 बळी घेतला. ‘मोहम्मद हाफिज’ याला सामनावीराचा किताब देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)