श्रीनगर – पाकीस्तानकडून आज कृष्णा घाटी आणि केरी सेक्टर परिसरामध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. कृष्णा घाटी हे जम्मू काश्मिरातील पूंच जिल्ह्यामध्ये, तर केरी सेक्टर राजौरी जिल्ह्यातील असून सीमेनजीक असलेल्या या भागावर आज पाकिस्तानतर्फे जोरदार गोळीबार करण्यात आला. केरी सेक्टर परिसरामध्ये या गोळीबारामध्ये मोहम्मद महरुफ हा स्थानिक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीला त्यानंतर भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
J&K: Pakistan violated ceasefire in Krishna Ghati Sector of Poonch district & Keri Sector of Rajouri district around 11 AM today by resorting to shelling with artillery and firing of small arms. Indian Army is retaliating.
— ANI (@ANI) May 5, 2019