जयपूर कारागृहात पाकिस्तानी कैद्याला ठेचून मारले 

जयपूर : जयपूर येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये आजीवन कारावासाची सजा भोगत असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाचा आज अन्य कैद्यांकडून दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शकरूल्लाह नामक ५० वर्षीय पाकिस्तानी नागरिक जयपूर येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये  २०११ पासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. आज कारागृहामध्ये कायद्यांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये शकरूल्लाहच्या डोक्यात अन्य कैद्यांनी मोठ्या आकाराचा दगड घालत त्याचा निर्घृण खून केला.

पाकिस्तानी कैद्याच्या हत्येमागे भारत-पाकिस्तान यांच्यातील पुलवामा हल्ल्यानंतर वाढलेला तणाव असल्याचा अंदाज असून याप्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांमार्फत करण्यात येईल तसेच दोषी कैद्यांवर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती राजस्थान पोलीस प्रमुख कपिल गर्ग यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)