पादहस्तासन – पाठीचा मणका आणि हाडांना लवचिकता देणारे.

हे शयन स्थितीतील आसन आहे. जमिनीवर पाठीवर झोपावे. हळूहळू श्‍वास घेत दोन्ही पाय जुळवून ते वर उचलावे. नंतर दोन्ही हात आणि डोके उचलून हाताने पायाचे अंगठे पकडावे. हात आणि पाय दोन्ही एकत्र मिळवून ताणावेत.

पायाच्या दिशेने डोके नेण्याचा प्रयत्न करावा. पाय गुडघ्यामध्ये ताठ ठेवावेत. नंतर श्‍वास सोडत हळूहळू सावकाश हात आणि पाय जागेवर न्यावेत. शरीर ढिले सोडावेत.

पादहस्तान हे करायला सोपे असले तरी विशिष्ट वयानंतर हे आसन जमेनासे होते. पण नियमित सराव केला असता जमू शकते. या आसनामुळे कंबरदुखी दूर होते. पाठीचा मणका आणि हाडांना लवचिकता येते. हृदयाला विश्रांती मिळते.

पोट हलके बनते. पचनशक्‍ती सुधारते. पाटाचे रोग बरे होतात. हात आणि पाय मजबूत होतात. स्त्रियांची तसेच पुरुषांची कामशक्‍ती वाढते.

पुरुषांना या आसनाचा विशेष फायदा होतो. त्यामुळे त्यांना कामस्फुर्तीची तृप्ती मिळते. म्हणून तरुण स्त्री पुरुषांनी हे आसन नियमित करावे.

प्रौढ स्त्री पुरुषांनी कंबरदुखी होऊ नये म्हणून या आसनाचा सराव ठेवावा. सुरुवातीला कालावधी पाच सेकंद नंतर पंधरा सेकंदांपर्यंत टिकवता येते. श्‍वास घेत घेत हातांनी पायाचे अंगठे पकडून पूर्णपणे मान उचलून ती दोन्ही हाताच्यामध्ये घेता आली पाहिजे. इतकी लवचिकता हे आसन प्रदान करते.

मात्र, योगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन करणे उत्तम. अन्यथा मानेला झटका दिला जाऊ शकतो. श्‍वासाचे तंत्र सांभाळून हे आसन करावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)