भारताची स्टार बॅडमिंटन पटू ‘सिल्व्हर’ गर्ल पी.व्ही. सिंधू थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचली आहे. उपांत्यफेरीमध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणारी सिंधू इंडोनेशियाच्या टूनजुंग हीचा सामना करणार आहे.
तत्पूर्वी सिंधूने उपांत्यफेरीत जागा बनविण्यासाठी मलेशियाच्या चेहा हिचा २१-१७, २१-१३ असा सहज पराभव केला. सिंधूने या सामन्यात सलग नऊ गुण कमविल्यामुळे प्रतिस्पर्धी चेहा हिच्यावर चांगलेच दडपण आले व याचाच फायदा उचलत सिंधूने सामन्यामध्ये बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)