पी.व्ही. सिंधूचा निसटता विजय

File photo

गंझुई – भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने वर्ल्ड टूर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या जपानच्या अकेने यामागूचीचा 24-22, 21-15 असा पराभव करत स्पर्धेची चांगली सुरुवात केली. तर भारताचा पुरुष खेळाडू समीर वर्माला पहिल्याच सामन्यात क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या किन्टो मोमाटाने 35 मिनिटात 18-21, 6-21 असे पराभूत केले.

सिंधूने पहिल्या सेटची चांगली सुरुवात केली. परंतु, यामागूचीने पुनरागमन करत 11-6 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने आपला खेळ उंचावत सामना 19-19 असा बरोबरीत आणला आणि अखेर 24-22 असा जिंकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या सेटमध्ये देखीलसुरुवातीला सिंधूचा दबदबा राहिला. परंतु तीन गुणांची पिछाडी भरून काढत यामागूचीने 11-10 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने सलग आठ गुण घेतसेट 21-15 असा जिंकत सामना जिमला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)