आमचे अध्यक्ष हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार

जयपाल रेड्डी यांनी केली राहुल यांची पाठराखण

कोची: राहुल गांधी यांनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषीत करण्याविषयी आता कॉंग्रेस पक्षातूनच आवाज उठवला जाऊ लागला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना आमच्या पक्षाचे अध्यक्ष हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असे विधान केले. अन्य पक्षांनी त्यांची उमेदवारी मान्य करण्यास काही वेळ लागू शकतो त्यासाठी आम्हालाही काही घाई नाही. युपीए आघाडी करताना घटक पक्षांनी राहुल गांधी यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मान्यता द्यावी अशीही आमची पुर्व अट नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या संबंधात त्यांनी सन 2004 चे उदाहरण देताना सांगितले की त्यावेळी सोनिया गांधी यांना कॉंग्रेसने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते पण सोनियांनी स्वत: युपीए आघाडीच पंतप्रधानपदाविषयी निर्णय घेईल असे स्पष्ट केल्याचा दाखला त्यांनी दिला. त्यामुळे युपीए आघाडीतील घटक पक्ष राहुल गांधी यांच्या नावावर सहमत होतील की नाहीं यावर निवडणुकीनंतर निर्णय होऊ शकतो. सोनिया गांधी यांची पंतप्रधानपदासाठी निवड होऊनही त्यांनी मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपद देऊ केले होते तसेच राहुल गांधी करतील काय असे विचारता रेड्डी म्हणाले की सोनियांच्या बाबतीत स्थिती थोडी वेगळी होती राहुल यांच्या बाबतीत तशी स्थिती नाही. आमच्यासाठी राहुल गांधी हे सर्वोच्च नेते आहेत आणि तेच कॉंग्रेस पक्षाचे तरी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असे त्यांनी निक्षुन सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)