राफेलचे आमचे मॉडेलच होते मेक ईन इंडियाची जननी : गुलामनबी आझाद

भोपाळ – राफेल विमान खरेदीसाठी आम्ही जे मॉडेल तयार केले होते त्यातून मोठी रोजगार निर्मीती तर झाली असतीच पण अन्य भारतीय उद्योगांनाही मोठे काम मिळाले असते. त्याअर्थाने आमचे राफेल मॉडेल हे मेक ईन इंडिया संकल्पनेची जननीच ठरली असती असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी केले आहे. ते मध्यप्रदेशातील पक्षाच्या प्रचार सभेत बोलत होते.  ते म्हणाले की आम्ही एकूण 126 राफेल विमाने खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता.

त्यातील 18 विमाने तयार स्थितीत आपल्याला फ्रांसकडून मिळणार होती व बाकीच्या विमानांचे उत्पादन आपल्याच देशात हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स या सरकारी मालकीच्या विमान कंपनीत होणार होते. त्यातून किमान 24 ते 25 हजार लोकांना रोजगार मिळाला असता. मेक ईन इंडीया या संकल्पनेलाच आम्ही या प्रकल्पातून चालना देऊ शकलो असतो. पण मोदींनी या करारात मोठा घोळ केला. आता मोदी सरकार केवळ 36 राफेल विमाने अत्यंत चढ्या भावात घेणार असून ती सर्व विमाने आपल्याला फ्रांसहून तयार होऊन मिळणार आहेत. त्यामुळे भारतातील रोजगार निर्मीतीची संधीही मोदींनी गमावली असून त्यात अब्जावधी रूपयांचा घोटाळाही झाला आहे असा आरोपही त्यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)