आपली लढाई काश्मिरींविरोधात नसून दहशतवाद्यांविरोधात आहे : पंतप्रधान मोदी 

जयपूर, (राजस्थान)  – “जर दहशतवाद कायम राहणार असेल, तर जगात शांतता नांदणे अशक्‍य आहे.’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातल्या सभेत बोलताना पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्यांप्रती आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधानांनी दहशतवादाविरोधात सामुहिक एकमत निर्माण झाल्याचे सांगितले.

काश्‍मिरींनाही शांतता हवी आहे… 
गेल्यावर्षी अमरनाथ यात्र्दरम्यान झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्यांसाठी रक्‍तदान करायला काश्‍मिरी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. काश्‍मीरमधील नागरिक गेल्या 40 वर्षांपासून दहशतवादात भरडले जात आहेत. त्यांनाही शांतता हवी आहे. अलिकडेच झालेल्या पंचायत निवडणूकांमध्ये 70-75 टक्के मतदान झाले आहे, याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली.  

केवळ भारतच नव्हे तर जगभरातून पुलवामातील शहिदांच्या कुटुंबीयांबरोबर आहे. देशाच्या जवानांवर आणि सरकारवर विश्‍वास ठेवा. आपण सर्व आघाड्यांवर समर्थपणे प्रगती करत आहोत. पण जर दहशतवाद अशाच प्रकारे कायम राहणार असेल, तर जगात शांतता नांदणे अशक्‍यच आहे. आज दहशतवादाविरोधात एकमत निर्माण झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. दहशतवादामुळे काश्‍मिरी युवकही अस्वस्थ आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपला लढा दहशतवादाविरोधात आहे, काश्‍मिरींविरोधात नाही. काश्‍मिरी देशवासियांच्या बरोबर आहेत, असे मोदींनी सांगितले. जम्मू काश्‍मीरमधील विभाजवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे आणि जम्मू काश्‍मीरमध्ये लष्कराला पूर्ण मोकळीक दिली गेले आहे. सीमेवरील सैनिकांवर आणि आई भवानीच्या आशीर्वादावर विश्‍वास ठेवावा, असे आवाहनही मोदींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)