अन्य पक्षांनाही राहुल गांधींबाबत आपली भूमिका मांडावी लागेल : डी राजा

नवी दिल्ली: डीएमके पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांनाच विरोधी आघाडीचे पंतप्रधान म्हणून घोषित करण्याची सूचना केली आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा यांनी म्हटले आहे त्यांच्या सुचनेनुसार आता अन्य पक्षांनाही राहुल गांधी यांच्या बाबत आपली भूमिका मांडावी लागेल..

आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की धर्मनिपेक्ष आणि डाव्या पक्षांना राहुल गांधी यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मान्यता द्यावी काय यावर आपली भूमिका मांडावी लागेल आणि त्यावर आम्ही विचार करून आमची भूमिकांमांडू. या विषयी नवीन घडामोडी कशा घडतात हे बघावे लागेल असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्टॅलिन यांनी रविवारी चेन्नाईत बोलताना राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुर्ण विश्‍वास व्यक्त करीत मोदींसारख्या फॅसिस्ट प्रवृत्तीच्या नेत्याला पराभूत करण्याची क्षमता केवळ राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पंतप्रधानपदी बसवुच असे त्यांनी म्हटले आहे. तथापी डाव्या पक्षांनी मात्र या विषयावर अद्याप पर्यंत तरी सावधच भूमिका घेतली आहे असे डी राजा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)