ओरिएंटल बॅंकेच्या व्याजदरात कपात

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सने आपल्या विविध कर्जावरील मुख्य व्याजदरात म्हणजे एमसीएलआरमध्ये 0.10 टक्‍क्‍यांपर्यंत कपात जाहीर केली आहे.

शेअरबाजाराला दिलेल्या माहितीत बॅंकेने म्हटले आहे की, एक महिना व सहा महिन्यांसाठीचा एमसीएलआर 0.10 टक्‍क्‍यांनी कमी करून तो अनुक्रमे 8.45 टक्‍के व 8.70 टक्‍के करण्यात आला आहे. एक वर्षासाठीचा एमसीएलआर 0.05 टक्‍क्‍यांनी कमी करून तो आता 8.70 टक्‍के करण्यात आला आहे.

बॅंकेचा ओव्हर नाइट आणि तीन महिन्यांसाठीचा एमसीएलआर अनुक्रमे 8.30 व 8. 50 टक्‍के इतका कायम ठेवण्यात आलेला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो पाव टक्‍क्‍यांनी कमी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)