मतदार जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

संग्रहित छायाचित्र

निवडणूक आयोगाची स्विप-2 मोहीम ः जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पुढाकार

नगर –
निवडणूक आयोगाच्या स्विप-2 मोहिमेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आली आहे. मतदार जनजागृतीसाठी अणि मतदानामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

निबंध, चित्रकला, घोषवाक्‍य, पोस्टर, मतदान प्रबोधनात्मक चित्रफित (व्हिडीओ), लघुपट निर्मिती स्पर्धा घेण्यात येणार आहे. मतदार जनजागृती उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ती, संस्थां, शाळा, महाविद्यालये यांना देखील पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. एकूण चार गटात या स्पर्धा होणार आहे. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते पदवीधर आणि खुला, असे हे चार गट असतील. निबंध स्पर्धांचे विषय पुढीलप्रमाणे ः मतदान-एक राष्ट्रीय कर्तव्य, लोकशाही आणि मतदानाचा हक्क, चला मतदानाला, मतदार राजा जागा हो आणि माझे आई-वडील मतदानाला जाणारच, असे असतील.
घोषवाक्‍य स्पर्धेसाठी विषय ः मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो. चित्रकला व पोस्टर स्पर्धेसाठी विषय ः मतदान केंद्र-भारताचे शक्तिस्थान, मतदार जनजागृती, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. वरीलपैकी कुठल्याही एक विषयावर व्हिडिओ व लघुपट निर्मिती करावयाची आहे.

व्यक्ती व संस्थांनी मतदान जनजागृतीसाठी केलेल्या कामाचा अहवाल प्रस्ताव स्वरूपामध्ये वृत्तपत्र कात्रणे, छायाचित्रे, प्रमाणपत्रे, विविध स्पर्धा व उपक्रमांचा तपशील याद्या जोडून सर्व प्रस्ताव, निबंध, चित्र, घोषवाक्‍ये, पोस्टर आदी साहित्य 20 एप्रिलपर्यंत जिल्हा परिषद, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, अहमदनगर या ठिकाणी जमा करावयाचे आहे. विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट पारितोषिके व शासनाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. स्पर्धकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान विषयक जनजागृती करावी व मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, तहसीलदार हेमा बडे,शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे (प्राथमिक), शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले (माध्यमिक) आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)