आंतर महाविद्यालयीन ‘टीचर्स लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन

पुणे – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे देशातील प्रथम महाविद्यालीयन शिक्षकांसाठी “टीचर्स लीग’ या आंतर महाविद्यालयीन क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 ते 29 एप्रिल 2019 या कालावधीत संपन्न होईल. या स्पर्धेसाठी सर्व महाविद्यालयातील जास्तीत जास्त शिक्षक व संघांनी 20 एप्रिल पूर्वी आपले नाव नोंदवावे. असे आवाहन एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रोहोस्ट प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत केले.

या स्पर्धेत क्रिकेट (पुरूष व महिला), व्हॉलीबॉल (पुरूष), थ्रोबॉल (महिला), बॅडमिंटन (पुरूष व महिला) व टेबल टेनिस (पुरूष व महिला) अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी करंडक, पदके व रोख रक्कम असे एकूण 3 लाख 50 हजार रुपयांची बक्षिसे व प्रशिस्तीपत्रके दिली जातील. सर्वसाधारण विजेत्या संघाला करंडक व 51 हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले जाईल. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेता व उपविजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)