मल्ल्याच्या बंगळूरमधील मालमत्ता जप्त करण्याचा आदेश 

नवी दिल्ली – येथील न्यायालयाने देशाबाहेर पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या बंगळूरमधील मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. परकी चलनाशी संबंधित कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ती कारवाई होणार आहे. न्यायालयाने मागील वर्षी मेमध्येच मल्ल्याच्या मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला होता.

त्यावर मल्ल्याच्या 159 मालमत्ता शोधण्यात आल्या आहेत. मात्र, त्या आम्ही जप्त करू शकलेलो नाही, असे बंगळूर पोलिसांनी न्यायालयात याआधी नमूद केले होते. पोलिसांनी मालमत्ता जप्तीच्या कारवाईसाठी आणखी अवधी मागितल्यावर न्यायालयाने नव्याने आदेश दिला. बंगळूर पोलिसांना 10 जुलैपर्यंत मल्ल्याच्या मालमत्ता जप्त करण्यास सांगण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात वारंवार समन्स बजावूनही हजर न राहिल्याने मल्ल्याला न्यायालयाने याआधीच फरार म्हणून जाहीर केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here