अनधिकृत मिळकती, पत्राशेडची देखील नोंद करण्याचे आदेश

वसुलीसाठी स्वाईप मशीन देण्याची सूचना

कर्मचाऱ्यांचे रोकड हाताळण्याचे काम कमी व्हावे. बीले वाटप करताना नागरिक कर भरण्यास तयार असतील तर, बीले वाटप करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे मिळकत कर वसुलीकरिता स्वाईप मशीन देण्याबाबत विचार करण्यात यावा, अशी सूचना मडिगेरी यांनी केली. दर महिन्याला ज्या करसंकलन विभागाचे उत्पन्न ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक मिळेल. अधिक करआकारणी प्रकरणे निर्गत होतील; त्या विभागाचे प्रशासन अधिकारी व मंडालधिकारी यांचा स्थायी समिती सभेत सत्कार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पिंपरी वाघेरे करसंकलन कार्यालय अव्वल

पिंपरी वाघेरे येथील करसंकलन कार्यालयाने 36 कोटी 97 या उदिष्टापैंकी 10 कोटी 68 लाखाचा सर्वाधिक कर वसूल केला आहे. तर, सर्वात कमी तळवडेतील विभागीय कार्यालयाने 10 टक्के कर वसूल केला आहे. तळवडेत अनधिकृत मालमत्ता आहेत. या मालमत्तांना नोटीस बजावून येत्या आठ दिवसात मिळकत कर वसूल करावा. कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता पाडण्यात यावी. तळवडेतील दोन पेट्रोल पंपाची तीन वर्षांपासून नोंद झाली नाही. त्याची नोंद करण्याची सूचनाही यावेळी स्थायी समिती अध्यक्ष मडिगेरी यांनी केली आहे.

पिंपरी –  शहरातील अनधिकृत बांधकामांची नोंद करून, त्या जागा मालकांकडून मिळकत कर वसूल केला जाणार आहे. याशिवाय खासगी जागेत असलेल्या टपऱ्या, पत्राशेडला 11 महिन्याचा कराराने परवाना देऊन त्यांच्याकडून मिळकत कर वसूल करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना प्रशासनला दिला. महापालिकेच्या महसूलात वाढ करण्यासाठी करसंकलन आणि बांधकाम परवाना या दोन्ही विभागाच्या एकत्रित बैठकीत उत्पन्नवाढीबाबत सोमवारी(दि.17)एकत्रित आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी विलास मडिगेरी यांनी सूचना केल्या. आयुक्‍त श्रावण हर्डीकर, प्रभारी शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, कर संकलन विभागीय कार्यालयाचे मंडल अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

शहरातील इमारतींना बांधकाम परवानगी विभागाकडून पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. परंतु करआकारणी होत नाही. अशा मालमत्तांची नोंद करुन करआकारणी करावी. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर जप्तीची कारवाई वर्षभर सुरु ठेवण्यात यावी, असा आदेश स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना प्रशासनाला दिला. तसेच अनधिकृत घरांच्या नोंदी केल्यास 100 कोटी, टपऱ्या, पत्राशेडमधून 100 कोटी असे 200 कोटी रुपये उत्पन्न वाढेल, असा दावाही त्यांनी केला.

याबाबत माहिती देताना मडिगेरी म्हणाले, उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महापालिका बांधकाम परवानगी विभागाकडून दिलेल्या जाणाऱ्या परवानगीची यादी कर संकलन विभागाला पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन मिळकतीची नोंद सुरु झाली आहे. परिणामी, उत्पन्न वाढीत भर पडली आहे. गतवर्षी बांधकाम परवनगीतून आजच्या तारखेला 58 कोटी 81 लाख उत्पन्न मिळाले होते.

यंदा त्यामध्ये वाढ झाली असून आजमितीला तब्बल 113 कोटी 13 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेने दुपटीने उत्पन्नात वाढ झाली आहे. तर, मालमत्ताकरातून गतवर्षी 82 कोटी 91 लाख उत्पन्न मिळाले होते. यंदा तब्बल 128 कोटी 63 लाखांचा महसूल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेने 56 टक्के उत्पन्नात वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)