ऑर्डर घेतली पनीर बटरची; अन् डिलिव्हरी चिकनची

झोमॅटो व हॉटेलला 55 हजाराचा दंड

पुणे – एका वकील ग्राहकाने झोमॅटोवरून पनीर बटर मसाला मागविल्यानंतर त्याला बटर चिकन पाठविल्याबद्दल ग्राहक मंचाने झोमॅटो व हॉटेलला 55 हजाराचा दंड ठोठावला.

वकील असलेल्या षण्मुख देशमुख यांच्याबाबत असा प्रकार दोन वेळा घडल्या नंतर त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. झोमॅटोने ग्राहक मंचाला सांगितले की, ही चूक हॉटेलची आहे. मात्र ग्राहक मंचाने हॉटेलसह झोमॅटोलाही दंड केला. हॉटेल व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली. चुकीबद्दल 50 हजार रुपये आणि मानसिक त्रासाबद्दल 5 हजार रुपये असा एकूण 55 हजाराचा दंड ठोठावण्यात आला. दंड 45 दिवसाच्या आत देणे अपेक्षित आहे. माध्यमात या संबंधात आलेल्या वृत्तानुसार हे दोन्ही पदार्थ एकसारखे दिसतात, त्यामुळे सुरूवातीला वकीलांनी तो पदार्थ खाल्ला. मात्र असा प्रकार होऊ नये, याकरिता त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here