उबर भारतीय बाजारपेठेबाबत आशावादी 

संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: राइड शेअरिंग कंपनी उबरने भारत व दक्षिण आशियातील 1 अब्जाहून अधिक राइड्‌सचा टप्पा गाठला. पाच वर्षांपूर्वी उबरने बेंगळुरूमधून भारतात आपल्या सेवेचा शुभारंभ केला होता आणि याच शहरामध्ये हा 1 अब्जचा टप्पा गाठणारी ट्रिप घेण्यात आली.
कंपनीचे अध्यक्ष प्रदीप परमेश्‍वरन म्हणाले, उबरसारखे तंत्रज्ञान शहरी प्रवासाच्या भवितव्याला आकार देऊ शकते याचा पुरावा आहे. त्यामुळे आम्ही भारतात आणखी गुंतवणूक वाढविणार आहोत. उबरने 10 जून रोजी जागतिक पातळीवर 10 अब्ज ट्रिप्सचा टप्पा गाठला. उबरला भारतीय उपखंडात प्रतिसाद मिळत आहे आणि कंपनीने भारत व दक्षिण आशियामध्ये 500 दशलक्ष ट्रिप्सचा टप्पा पूर्ण केल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच हा 1 अब्जाचा टप्पा गाठला आहे.
670 दशलक्ष ट्रिप्सद्वारे 11.1 अब्ज किमी अंतर कापण्यात आले आहे. आतापर्यंत उबरपूल ट्रिप्सने 200 दशलक्ष किमीहून अधिक प्रवास टाळण्यात मदत केली आहे. ज्यामुळे 36,537 टन किग्रॅहून अधिक कार्बन डायऑक्‍साईड वायूचे उत्सर्जन कमी झाले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोसरोषी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बेर्नी हॅरफोर्ड यांनी भारत हे उबरच्या विकासगाथेसाठी मुख्य स्थान असल्याचे सांगीतले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)