मोदी सरकारकडून राजीव गांधींच्या हत्याऱ्यांच्या सुटकेचा विरोध

नवी दिल्ली: राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील ७ दोषींची सुटका करण्याच्या प्रस्तावाला केंद्रातील मोदी सरकारने विरोध दर्शविला आहे. तामिळनाडू सरकारने हा प्रस्ताव मांडला होता.

“राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील ७ दोषींची सुटका करण्याबाबत तामिळनाडू सरकारच्या प्रस्तावाचे केंद्र सरकार समर्थन करणार नाही. अशा गुन्हेगारांना माफी दिली तर अशी परंपरा पडत जाईल. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटतील. असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले.

न्यायमूर्ति रंजन गोगोई, न्यायमूर्ति नवीन सिन्हा आणि न्यायमूर्ति के एम जोसेफ या तीन सदस्यीय खंडपीठाने गृह मंत्रालयाचा निर्णय ऐकून या सुनवाईला स्थगिती दिली.

केंद्रीय गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव वी. बी. दुबे म्हणाले, ” केंद्र सरकार दंड प्रक्रिया संहिता, १९७३ (कलम ४३५) चे पालन करत असून २ मार्च २०१६ च्या पत्रात म्हटल्याप्रमाणे राजीव गांधी यांच्या हत्त्या प्रकरणातील ७ दोषीना माफ करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)