विरोधक छेडणार ‘लोकतंत्र बचाओ’, ‘देश बचाओ’ची मोहीम ; राजधानीत महत्वाची बैठक

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. विरोधकांनी येत्या २२ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. ‘लोकतंत्र बचाओ’, ‘देश बचाओ’ची मोहीम विरोधक छेडणार असल्याचे वृत्त आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांत पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या राज्यांमध्ये जाऊन विरोधकांच्या एकजुटीचा संदेशही विरोधक देणार असल्याची माहिती मिळत आहे.

-Ads-

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी छत्तीसगडमध्ये सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाशी आघाडी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिल्लीत आयोजित केलेल्या बैठकीत त्या उपस्थित राहणार नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)