कझाखस्तानच्या राजधानीचे नाव बदलायला विरोध 

अलमती (कझाखस्तान) – कझाखस्तानची राजधानी अस्तानाचे नाव बदलून माजी अध्यक्ष नूरसुलतान नाझारबायेव यांचे नाव देण्यास मोठा विरोध व्हायला लागला आहे. या प्रस्तावित नामांतराला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुमारे तीन दशके अध्यक्षपदी राहिल्यानंतर नूर सुलतान नझरबायेव यांनी पद सोडले होते. त्यांच्या गौरवार्थ राजधानीला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नूरसुलतान नझरबायेव यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर 24 तासांच्या आत बुधवारी त्यांचे विश्‍वासू आणि राजकीय निष्ठावंत कस्सम जोमार्ट टोकायेव यांना अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर लगेचच टोकायेव यांनी अस्ताना शहराचे नाव बदलून नूरसुलतान करण्याचा प्रस्ताव मांडला. कझाखस्तानच्या संसदेने तासाभरातच या प्रस्तावाला संमती दिली.

मात्र या प्रस्तावित नामांतराला विरोध व्हायला लागला असून काही आंदोलकांना पोलिसांनी विरोध केला आणि नंतर सोडूनही दिले. टोकायेव हे नझरबायेव यांची उर्वरित मुदत पूर्ण होईपर्यंत कझाखस्तानचे अध्यक्ष असतील. नझरबायेव यांच्या ज्येष्ठ कन्या दारिगा नझरबायेव यांची संसदेच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती झाली आहे. त्यामुळे भविष्यात त्याच वडिलांच्या जागी अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)