विरोधी पक्षांचे मनसुबे उधळले

लोकसभा निवडणूक : 1971

1967 च्या लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा कमी जागा मिळाल्यानंतर पक्षांतर्गत इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या निर्णयावरून प्रश्‍न विचारले जाऊ लागले. चौदा बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांच्या विरोधात व्ही. व्ही. गिरी यांना इंदिरा गांधी यांनी पाठिंबा दिल्याने कॉंग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिला.

राजकीय मतभेदातून कॉंग्रेस पक्षातच दोन गट पडले होते. परिणामी 84 वर्षाच्या सर्वात जुन्या पक्षात फाळणी झाली. एकीकडे इंदिरा गांधी आणि दुसरीकडे मोरारजी देसाई. ज्येष्ठ नेते मोरारजी देसाई यांच्यासमवेत होते, मात्र संघटना आणि कार्यकर्त्यांवर इंदिराजींची मजबूत पकड होती. पाचवी लोकसभा निवडणूक 1972 रोजी होणार होती, मात्र इंदिरा गांधी यांनी वेळेच्या अगोदरच निवडणुका जाहीर केल्या. मतदारांची संख्या ही 27 कोटींवर पोचली होती. तर एकूण 53 पक्ष मैदानात होते. 1967 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी तुलनेने कमकुवत राहिली होती. आता विभाजानानंतर कॉंग्रेस पाचव्यांदा सत्तेत येईल की नाही यावर शंका कुशंका घेतल्या जाऊ लागल्या.

कॉंग्रेसपासून वेगळा झालेला कॉंग्रेस (संघटन) यांच्यासमवेत डावी आघाडी, जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष हे सत्तारूढ पक्षाला आव्हान देत होते. मार्चमध्ये निवडणुका पार पडल्या. विविध राजकीय पक्षांनी निवडणुका जिंकण्यासाठी जोर लावला होता. सभा आणि प्रचारफेऱ्यांमध्ये लाऊडस्पिकरचा वापर केला गेला. वेगवेगळ्या राज्यात काही दलांनी आघाडी करत कॉंग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा निकाल लागले, तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का बसला. पक्षाला मोठे भगदाड पडूनही कॉंग्रेसने 352 जागा जिंकून दणक्‍यात यश मिळवले. विरोधकांनी कितीही बळ एकवटले तरी कॉंग्रेसला कोठेच आव्हान मिळाले नाही, असे निकालांवरून दिसते.

तमिळनाडूत बाजी मारली
पहिल्या चार लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीत आघाडी घेणाऱ्या केरळला यावेळी मात्र तमिळनाडूने मागे टाकले. सरासरी 55.27 टक्‍के मतदानाच्या तुलनेत तमिळनाडूत 71.82 टक्‍के मतदान झाले. राजस्थानात 23 जागांसाठी 54.05 टक्‍के मतदान पार पडले. मध्य प्रदेशमध्ये 37 जागांसाठी 48 टक्‍के, उत्तर प्रदेशमध्ये 85 जागांसाठी 46.01 टक्‍के आणि हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी 41.19 टक्‍के मतदान झाले.

तीन लाखाहून अधिक बूथ
पाचव्या लोकसभा निवडणुकीत 27.41 कोटी मतदारांनी एकूण 3 लाख 42 हजार 918 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 800 मतदार होते. राजस्थानात 1 कोटी 32 लाख 44 हजार 456 मतदारांसाठी एकूण 16 हजार 412 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. त्याचवेळी मध्यप्रदेशमध्ये 1 कोटी 95 लाख 78 हजार 837 मतदारांसाठी 25 हजार 728 बूथची निर्मिती केली होती. दादर आणि नगर हवेलीत सर्वात कमी 42 मतदान केंद्र होते.

महाराष्ट्र-आंध्रात एक-एक जागेवर 16 उमेदवार
लोकसभेच्या 518 जागांसाठी एकूण 2784 उमेदवार रिंगणात होते. म्हणजेच प्रत्येक जागेवर सरासरी उमेदवारांची संख्या 5.37 एवढी होती. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये एका -एका जागेवर सर्वाधिक 16 उमेदवारांनी आपले नशिब आजमावले होते. उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्ली येथे एक एक जागेवर 15-15 उमेदवार रिंगणात होते. एल एम अँड ए आयलॅंडची अशी एकच जागा होती की तेथे उमेदवार बिनविरोध निवडून आला. कॉंग्रेसचे सदानाथ मोहंमद सईद इथून निवडून गेल

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)