उद्धव ठाकरेंकडून संधीचे राजकारण 

राज किमान संधीसाधू नाहीत, मिलिंद देवरा यांचे मत 

मुंबई – उद्धव ठाकरेंनी संधीचे राजकारण केले आहे, किमान मनसे अध्यक्ष राज ठाकरे संधीसाधू नाहीत, असे वक्तव्य कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केले आहे. मात्र महाआघाडीत मनसे समाविष्ट होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. युती झाली असली तरी शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केले? असा प्रश्न मिलिंद देवरा यांनी उपस्थित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जेव्हा मोदींची लाट होती, तेव्हा सेनेने स्वतःचा फायदा करुन घेतला. जेव्हा मोदी विरोधात जनमत गेले तेव्हा त्यांच्यावर टीका केली. मूळात शिवसेनेने काय केले! तीन पेंग्विन आणि शिव वडा व्यतिरिक्त सेनेने काहीच केले नाही. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काम केले नाही. त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते, जनता नाराज आहे. अशी टीकाही देवरा यांनी केली.

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल आणि राजकारणातूनही निवृत्ती घ्यावी लागेल, असे संकेत मिलिंद देवरांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन दिले होते. मात्र आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचेही स्पष्ट केले. राज ठाकरे आणि आमच्या विचारधारेत फरक आहे, त्यामुळे महाआघाडीत मनसेला घेण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल असली, तरी कॉंग्रेस त्यांना जवळ ओढण्याची शक्‍यता कमी आहे. प्रिया दत्त, संजय निरुपम आणि मुंबई कॉंग्रेस हा पक्षांतर्गत प्रश्न असल्यामुळे याबाबत बोलणार नसल्याचे देवरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)