‘जन्मसिद्ध’ नागरिकत्वाच्या अधिकाराला ट्रम्प यांचा विरोध 

भारतीयांना फटका बसण्याची शक्‍यता 

वॉशिंग्टन  – परदेशातून अमेरिकेत वैध वा अवैध मार्गाने आलेल्या व्यक्तींच्या मुलांना अमेरिकेत जन्म झाल्यमुळे कायद्यानुसार मिळणारे अमेरिकेचे नागरिकत्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे यापुढे मिळणे अवघड होणार आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीय नागरिकांना बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा सर्वप्रथम स्तलांतरित मुद्दा ऐरणीवर आणला होता. आज अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या वाढत जाण्यामागे जन्मामुळे मिळणारे अमेरिकन नागरिकत्व हेही मुख्य कारण आहे. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत हा कायदाच रद्द केला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

यावेळी ट्रम्प म्हणाले होते अमेरिका हा जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे, जेथे परदेशी येतात, त्यांचे मुल जन्माला आले कि त्याला अमेरिकन नागरिकांना मिळणारे सर्व लाभ मिळतात आणि 85 वर्षापर्यंत हे नागरिकत्व त्यांना उपभोगता येते. या कायदा हास्यास्पद आहे आणि तो रद्द करण्याचा विचार सुरु आहे. आई-वडिलांकडे नागरिकत्व नसतानासुद्धा जन्म अमेरिकेत झाल्यास, त्या बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. हा कायदा हास्यास्पद आहे, असे ट्रम्प यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी म्हटले होते. या विधानावर अमेरिकेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जन्माद्वारे नागरिकत्व बहाल करण्याचा अधिकार केवळ कार्यकारी आदेशाने हिसकून घेता येणार नाही, असे परखड मत अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती पॉल रायन यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी विधान केले होते. त्यावर रायन यांनी जोरदार टीका केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)