आजच्या बाजारात दडलेल्या संधी (भाग-१)

“The stock market is filled with individuals who know the price of everything, but the value of nothing”. – फिलिप फिशर.


“Investor focuses on business performance speculator focus on price performance”. – बेंजामिन ग्रॅहम

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिलिप फिशर (इ.स.१९०७ – २००४) यांचं हे उदाहरण आजच्या बाजाराबद्दल बरंच कांही सांगून जातं. उत्तम गुंतवणूकदारांमध्ये फारसे परिचित नसलेलं एक नांव म्हणजे फिलिप फिशर. १९५८ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘कॉमन स्टॉक्स अँड अनकॉमन प्रॉफिट्स’ या पुस्तकामुळं त्यांचं नाव चर्चेत आलं. २०१८ च्या वार्षिक भागधारक सभेमध्ये स्वतः वॉरेन बफेनी या पुस्तकास एक उत्तम पुस्तक म्हटलं. तर, तमाम गुंतवणूक जगतात बेंजामिन ग्रॅहम (इ.स. १८९४ – १९७६) यांना फादर ऑफ व्हॅल्यू इन्वेस्टींग म्हटलं जातं.  वॉरेन बफे यांचं वर्णन करताना अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार जॉन ट्रेन म्हणतात की वॉरेन बफे हे ८५% बेंजामिन ग्रॅहमनी व १५ % फिलिप फिशरनी प्रभावित आहेत.

आजच्या बाजारात दडलेल्या संधी (भाग-२)

मागील लेखात म्हटलं होतं की रिलायन्स इन्फ्रा व टाटा मोटर्स या सर्वांत जास्त पडलेल्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी प्राप्त होऊ शकते. मागील दोन तीन आठवड्यात रिलायन्स इन्फ्रा ह्या कंपनीच्या शेअर्सचे भाव ३९ % वधारले आहेत तर टाटा मोटर्सच्या शेअर्सनी ३४ % परतावा दिला आहे. तर गुंतवणुकीसाठी अत्यंत जोखमीचा अशी बिरुदावली मिरवलेल्या अनिल अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटलनं याच २-३ आठवड्यांत सुमारे ६६ टक्के परतावा दिलेला आहे.आता एकाच समूहातील वरील दोन कंपन्यांची उदाहरणं घेतली तर दोन्ही कंपन्या ह्या निरनिराळ्या क्षेत्रातील आहेत. एकूणच, जोखमीच्या आधीन राहूनच गुंतवणूक करण्याचे सूत्र असल्यामुळं अशावेळी अशा प्रकारच्या कंपन्यांचा विचार न केल्यासच नवल व ज्यांनी अशा कंपन्यांना गांभीर्यानं घेतलं त्यांना लाभ देखील तसाच जबरदस्त झालेला दिसतो. आता येथे वरील दोन्ही उदाहरण लक्षात घेतल्यास ह्या कंपन्या नक्कीच आकर्षक वाटत होत्या, गुंतवणूक म्हणून अथवा ट्रेडिंग म्हणूनआणि व्हॅल्यू इन्वेस्टींग करणाऱ्यांनी याचा नक्कीच फायदा उठवला असेल. दोन्ही कंपन्यांचे भाव/उत्पन्न गुणोत्तर (पीई रेश्यो) हे नक्कीच अनुकूल होतं. रिलायन्स कॅपिटल रु.१०२.३५ (पीई रेश्यो ६.७९ / त्या क्षेत्राचा पीई रेश्यो ३३.९१) तर रिलायन्स इन्फ्रा रु.९६.५५ (पीई रेश्यो २.७६ / त्या क्षेत्राचा पीई रेश्यो ९.२६).तर अगदी तीन आठवड्यांच्या याच कालावधीमध्ये सेन्सेक्स तब्बल १३०० अंशांनी घसरला आहे. त्यामुळं पुन्हा हेच अधोरेखित होतं की गुंतवणुकीसाठी कोणतेच टायमिंग नसतं, फक्त संधी ओळखून त्यातून फायदा करून घ्यायचा असतो. आजच्या लेखात आपण अशाच काही कंपन्यांविषयी पाहू ज्यांबद्दल मागील वर्षी  नोव्हेंबरच्या लेखात संक्षिप्त उल्लेख केलेलाच होता. याआधीच्या लेखांत अशा कंपन्यांबद्दल माहिती दिली असल्यानं या लेखात अशा कंपन्यांच्या बाबतीतील ताज्या घडामोडींविषयी पाहू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)