विरोधक आक्रमक ! चर्चा नको, अहवाल दाखवा – अजित पवार

मुंबई: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून, अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच आरक्षणाच्या अहवालावरून विधानसभेत चर्चा झाली. यावेळी मराठा आणि धनगर आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडण्यावरून गदारोळ पाहायला मिळाला. यामुळे सभागृहाचे कामकाजही तहकूूब करावे लागले.

अधिवेशनात फक्त एकच मुद्दा चांगला गाजतो ‘आरक्षण’ विरोधक याबाबत आक्रमक आहेत. त्यामुळे सर्वात कमी कालावधी असलेले हिवाळी अधिवेशन आरक्षण मागण्यातच संपते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री, महसूल मंत्री, सांस्कृतिक मंत्री मराठा आरक्षणाबाबत वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे मराठा समाजात संभ्रमाची अवस्था आहे. मंगळवारी सकाळी सभागृहात सांगितले की, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारला आहे, दुपारी सांगण्यात आले की, अहवाल स्वीकारला नाही, फक्त शिफारशी स्विकारल्या आहेत, त्यामुळे सरकारकडून याबात संभ्रम निर्माण केला जात असून सरकारने याबाबत सभागृहाला माहिती द्यावी, असे अजित पवार म्हणाले. अधिवेशनाचा पहिला आठवडा संपत असतानाही मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अजून पटलावर ठेवला गेलेला नाही. या आयोगाचे सदस्य बाहेर मीडियाच्या माध्यमातून विविध भाष्य करत आहेत, असेही पवार म्हणाले.

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत टिसने अहवाल तयार केला आहे, तो अहवालही सभागृहासमोर ठेवला गेलेला नाही. आरक्षण कसं देणार हे पण सांगायला हवं. ओबीसी समाजात भीती आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या. त्यामुळे चर्चा नको, अहवाल दाखवा, ही आमची मागणी आहे.

आज शेतकऱ्यांनी पुन्हा त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे, कारण सरकारने मागच्या वेळी जे आश्वासन दिले होते अजूनही पूर्ण केले नाही. मुख्यमंत्र्यांनी मागील मोर्चाच्यावेळी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की, पुढील ६ महिन्यात त्यांचे प्रश्न मार्गी लावू, पण अजूनही ते प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा मोर्चाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. या शेतकरी कुटुंबांसह आलेत, त्यांच्या पायात चप्पल नाही, लहान मुले सोबत आहेत, जेवण नाही, अशा अवस्थेतही सरकारदरबारी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आलेल्या या शेतकऱ्यांना त्यांचे हक्क कधी मिळणार? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

आतापर्यंत २६००० शेतकरी आत्महत्या झाल्या, सरकारतर्फे तुटपुंजी मदत दिली जात आहे. सरकारने त्वरित पाऊले उचलावीत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, त्यांचा आक्रोश ऐकून तरी सरकारला पाझर फुटेल का? अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)