बोरगाव पोलिसांचे संचलन

संग्रहित छायाचित्र

नागठाणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बोरगाव, ता. सातारा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी पोलिस दलाच्यावतीने येथील गावांमधून पोलीस पथकाचे संचलन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर नागठाणे (ता. सातारा) येथे गुरुवारी पोलिस दलाने संचलन केले.
महामार्गावरील चौकातून संचालनास सुरवात झाली. सासपडे चौक, केंद्रशाळा, ग्रामपंचायत कार्यालय, हनुमान मंदिर, बावडी, बेघरवस्ती, बॅंक ऑफ महाराष्ट्र मार्गे पुन्हा सासपडे चौक येथे येऊन हे संचलन विसर्जित करण्यात आले. सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख, बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि.

संतोष चौधरी, पोलिस उपनिरीक्षक पी. के. राठोड यांच्यासह तीन पोलीस अधिकारी व 40 पोलिस जवान या संचलनात सहभागी झाले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बोरगांव पोलिसांनी भागातील 40 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून तिघांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. सुमारे 70 परवानाधारक शस्त्रधारकांनी शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. आचारसंहितेच्या काळात विविध गावांतील 10 ठिकाणी अवैध दारूविक्री धंद्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. तसेच 15 जणांना हद्दपार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)