ऑपरेशन ऑल आऊट-महिन्यात 35, तर आठवड्यात 20 दहशतवादी ठार 

श्रीनगर: भारतीय सुरक्षा दलांनी चालवलेल्या “ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेला मोठेच यश मिळत आहे. गेल्या महिनाभरात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये 35 दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या आठवड्यातील चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी 20 दहशतवादी टिपले आहेत. गेल्या वर्षभरात सुरक्षा दलांनी मारलेल्या अतिरेक्‍यांची संख्या 229 वर गेली आहे.

चार महिन्यातील आकडेवारी 
जुलै – 11 
ऑगस्ट – 28 
सप्टेंबर – 29 
ऑक्‍टोबर – 28

लष्कराने पोलिसांच्या मदतीने अतिरेक्‍यांविरूद्ध धडक मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत लष्कराने मोस्ट वॉन्टेंड दहशतवाद्यांची एक यादी तयार केली आहे. त्या पहिल्या यादीतल्या जवळपास सर्व दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले. यात बुऱ्हान वाणी ठार झाला होता. अतिरेक्‍यांविरूद्धच्या मोहिमेत बचावात्मक पवित्रा न घेता आक्रमक धोरण सुरक्षा दलाने स्वीकारल्याने या मोहिमेला यश आले आहे.

दरम्यान, दरवर्षी हिवाळा सुरू होण्याआधी काश्‍मिरात घुसखोरीत वाढ होते. हिमवर्षाव सुरू होण्याआधी अतिरेकी पाकिस्तान सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. हिमवर्षावाला सुरुवात झाल्यानंतर त्यांना दऱ्या खोऱ्यातून वाट काढणे शक्‍य नसते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात हे अतिरेकी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानी सैन्य या अतिरेक्‍यांना संरक्षण देण्यासाठी प्रचंड गोळीबार करतात. त्यामुळे सुरक्षा दलाला ही घुसखोरी रोखणे आव्हान असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)