“बीआरटी’ मार्ग सर्वांसाठी खुला करा

पुणे – शहरातील मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडी, बीआरटी मार्गावरील बंद झालेले थांबे, पीएमपीच्या बसला “बीआरटी’ मार्गातून वारंवार आत-बाहेर करावा लागणारा प्रवास आणि यामुळे उद्भवणारी अपघातसदृश परिस्थितीमुळे नगर रस्त्यावरील “बीआरटी’ मार्ग सर्व वाहनांसाठी खुला करावा, अशी मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुणे महापालिकेकडे केली आहे.

नगर रस्त्यावरील अनेक ठिकाणी मेट्रोचे खांब उभारण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर नगर रस्त्यावर पीएमपी बससाठी स्वतंत्र “बीआरटी’ मार्ग आहे. मात्र, मेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावरील गुंजन चौकातील दोन बसथांबे, आगाखान पॅलेस येथील एक आणि रामवाडी चौकातील एक बस थांबा पूर्णपणे बंद केला आहे. त्याचबरोबर या “बीआरटी’ मार्गातील पाच बस थांब्यांपैकी तीन बस थांबे बंद असून केवळ दोनच बस थांबे सुरू आहेत. गुंजन चौक, येरवडा ते वडगावशेरी फाटा या दरम्यान “बीआरटी’ व “नॉन बीआरटी’ मार्ग असे तीन वेळा पीएमपी बसला मार्गातून आत-बाहेर करावे लागते. यामुळे रस्त्यावरील इतर वाहनांना अडथळा निर्माण होत असून यामुळे अपघाताची होण्याची शक्‍यता वाढली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पीएमपी बस नगर रस्त्यावरील बीआरटीचा वापर करत नाहीत. त्यामुळे सध्या वापरात असलेली बीआरटी लेन इतर सर्व वाहनांसाठी खुली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)