‘आर्टिकल-३५A’ ला हात लावला तर काश्मिऱ्यांच्या हातात तिरंगा नसेल : मेहबुबा मुफ्ती

जम्मू : पीपल्स ड्रेमोक्रॅटीक पक्षाच्या सर्वेसर्वा मेहबुबा मुफ्ती यांनी आज ‘आर्टिकल-३५A’ बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये फेब्रुवारी २६ ते २८ दरम्यान होणाऱ्या सुनावणी वरून गंभीर वक्तव्य केलं आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मेहबुबा मुफ्ती यांनी ‘आर्टिकल-३५A’वरून भारताला दम भरला असून त्या म्हणाल्या, “आगी सोबत खेळू नका. आर्टिकल-३५A सोबत छेडछाड केल्यास तुम्ही ते बघाल जे तुम्ही १९४७ पासून कधीच पाहिलं नाही. आर्टिकल-३५A मध्ये बदल केले गेल्यास काश्मिरी नागरिक तिरंगा सोडून पर्याय नसल्याने दुसऱ्या कोणाचा ध्वज हाती घेईल.”

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील ‘आर्टिकल-३५A’ या कायद्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले असून याबाबतची सुनावणी २६ ते २८ फेब्रुवारीपासून होणार असून याबाबत जम्मू आणि काश्मीरमधील विविध पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहे ‘आर्टिकल-३५A’?   

आर्टिकल-३५A अनुसार जम्मू आणि काश्मिरातील सरकारला तेथील कायमस्वरूपी रहिवासी ठरवण्याचा अधिकार आहे. जम्मू आणि काश्मिरातील कायमस्वरूपी रहिवाशांना काही विशेष अधिकार देण्यात आले असून यामध्ये जम्मू आणि काश्मिरात संपत्ती विकत घेणे, व्यवसाय करणे इत्यादी अधिकारांचा समावेश आहे.’आर्टिकल-३५A’ अनुसार जम्मू आणि काश्मिरातील अस्थायी रहिवाशी ठरवण्याचा अधिकार देखील येथील सरकारला आहे.

 

https://twitter.com/ANI/status/1100016312296734723

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)