सातारा: सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा पराभव केला आहे. उदयनराजे भोसले यांना अवघे ५,६८,९७८ मते पडली आहेत तर नरेंद्र पाटील याना ४,४६,६९२ मते पडली आहेत. उदयनराजे यांनी अवघ्या १,२२,२८६ मतांनी आघाडी घेतली आहे.
‘साताऱ्यात फक्त आपलीच हवा’ चालते हा उदयनराजेंच्या डायलॉग खरा ठरला आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहेत. पुन्हा भाजप सत्ता स्थापनेसाठी तयार असून भाजपने ३०० पेक्षा जास्त ऐतिहासिक लीड घेतली आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विजयी, शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा पराभव#सातारा #लोकसभानिवडणूक२०१९ #महाराष्ट्र #LokSabhaElections2019 pic.twitter.com/LyGLJyHuGy
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 23, 2019