…तरच गावाची प्रगती : कल्याणी

रहिमतपूर – गावात राहणाऱ्या कुटूंबाच उत्पन्न तीन वर्षात दुप्पट व्हावे. प्रत्येकाची आर्थीक प्रगती झाली तर गावाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही असा विश्‍वास भारत फोर्स चे चेअरमन बाबासाहेब कल्याणी यांनी व्यक्त केला भारत फोर्स कंपनीच्या सीएसआर फंडातून रहिमतपूर परिसरातील बारा गावामध्ये विकासकामे सुरु आहेत. कामाच्या पाहणीसाठी बाबासाहेब कल्याणी, सौ सुनिताताई कल्याणी यांनी न्हावी, नागझरी, बोरगाव येथे भेट दिली. धामणेर ता कोरेगावं येथील विवीध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मेजर जनरल विजय पवार, अरुण पवार सौ लिना देशपांडे, जयदिप लाड उपास्थित होते. पुढे ते म्हणाले, भारत फोर्सच्या व्हिलेज इम्प्रव्हमेंट प्रोगॉम अंतर्गत महाराष्ट्रातील शंभर गावात ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन काम करीत आहोत.
आपणाला पुढे जायचेय हा गावाचा विचार असायला पाहिजे. गावाची प्रगती करायचीय ही मानसिकता तयार झाली, गावकऱ्यांचा उत्साह असेल तर आम्ही बदल घडवून आणू. पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते व स्वच्छता या पंचसुत्री वर भारत फोर्स काम करीत असून सर्वांनी उस्ताहाने सहभाग घ्यावा. प्रास्ताविक शहाजी क्षिरसागर, आभार अशोकराव देसाई यांनी मानले. यावेळी न्हावी, बोरगाव, तारगांव, नागझरी, कण्हेरखेड, एकंबे, निगडी, सासुर्वे, कठापूर, शिरढोण, सायगाव या गावाचे सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ उपास्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)