मी निवडणूक लढवणार या केवळ अफवा – सलमान खान

मुंबई – आगामी लोकसभा निडणूक लढवणार असल्याच्या वृत्तावर ट्विट करत अभिनेता सलमान खानने आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी देखील जाणार नसल्याचे सलमानने ट्विटमध्ये म्हंटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पसरली होती.

त्यातच आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विट ला रिट्विट करत सलमानने आगामी लोकसभा निवणुकीसाठी जागृती करताना आपण लोकशाहीत राहत असून, प्रत्येक भारतीयाने मतदानाचा आपला हक्क बजावणे हे कर्तव्य असल्याचे म्हंटले आहे.

त्यानंतर लगेच काही वेळाने पुन्हा ट्विट करत सलमानने, ” मी लोकसभा निवडणूक लढवणार अशा बातम्या पसरल्या आहेत. त्या अफवा असून, मी निवडणूक लढवणार नाही आणि कोणत्याही पक्षाच्या प्रचार करणार नाही.” असे म्हंटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला मध्यप्रदेशातील इंदूर मधून काँग्रेस कडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण आता मात्र खुद्द सलमान खाननेच खुद्द यावर भाष्य करत आपण निवडणूक लढवणार असल्याचे नाकारले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)