सत्तेचा माज उतरवण्याची ताकद फक्‍त शिवबंधनातच

 तानाजी सावंत यांनी भाजपवर साधला निशाणा 

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरूवात झाल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात एकीकडे मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. तर आता दुसरीकडे जलसंपदामंत्री तानाजी सावंत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.सत्तेचा माज आला असेल तर तो उतरविण्याची ताकद फक्‍त शिवबंधनात असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. सावंत यांच्या या वक्‍तव्याने आता दोन्ही पक्षात वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. आज प्रत्येक क्षणाला सावध राहण्याची गरज नाही. आम्ही गाफील राहणार नाही, जर कोणाला सत्तेचा माज आला असेल तर तो उतरवण्याची ताकद फक्‍त शिवबंधनातच आहे, त्यामुळे आम्हाला धमक्‍या देण्याच्या भानगडीत कोणी पडू नये,असे वक्‍तव्य सावंत यांनी केले. तसेच एकला चलो रे किंवा युती करायची कि नाही याचा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतली असेही सावंत यांनी म्हटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)