फक्‍त सेक्‍सी आणि मद्यपी महिलांचेच रोल मिळतात – माही गिल

“साहेब, बिबी और गुलाम’ आणि “देव डी’सारख्या सिनेमांमधून माही गिलने केलेल्या कामाला म्हणावे तसे स्वीकारले गेले नाही. तिच्या कामाला प्रेक्षकांकडून म्हणावी तशी पसंती मिळाली नाही, याची तिला खंत आहे. पण याच्याशिवाय तिला आणखी एक टोचणी लागून राहिली आहे. ही टोचणी तिने एका इंटरव्ह्यूमध्ये बोलून दाखवली आहे.

एकतर सध्याच्या स्पर्धेमध्ये चांगले रोल मिळतच नाहीत. आपल्या वाट्याला आलेल्या बहुतेक रोलमध्ये मद्यपी आणि सेक्‍सी बारगर्लंचेच रोल होते. अशावेळी नाईलाजाने कॉल गर्लचा रोल देखील करायला लागल्याचे दुःख तिला टोचते आहे. “साहेब, बिबी और गॅंगस्टर’सारखे रोल तिला अजूनही मिळत आहेत. पण आता तिला असे रोल करायचे नाही आहेत.

ऍक्‍टिंगच्या फिल्डमध्ये जसे काम करायचे होते, तशी आपल्याला संधीही मिळाली नाही, असे तिला वाटते. बॉलीवूडमध्ये अनेक घराण्यांनी प्रस्थ जमवले आहे. त्यांच्या वारसांनीही आता बॉलीवूडमध्ये स्थान पक्‍के केले आहे. भलेही त्यांन ऍक्‍टिंग येतही नसेल. पण त्यांना चांगले रोल दिले जातात. पण आपल्या करिअरला मात्र बॉलीवूडमध्ये टाईपकास्ट करून टाकले गेले आहे, असे ती म्हणाली.

“फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ या आगामी सिनेमामध्ये तिला प्रथमच कौटुंबिक रोल मिळाला आहे. “…ठाकूरगंज’मध्ये तिच्याबरोबर जिमी शेरगील आणि सौरभ शुक्‍ला सारखे दिग्गज कलाकार आहेत. कदाचित या सिनेमानंतर माहीबाबतची प्रतिमा बदलल्याचे बघायला मिळेल. किमान तिला तरी तसे समाधान मिळेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)