केवळ मोदीच पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ शकतात – अमित शहा

दहशतवाद पसरवणारांच्या विरोधात कारवाईची सुरक्षा दलांना मुभा

जम्मू – पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील एकमेव नेते आहेत, अशी स्तुतिसुमने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी उधळली. तसेच, जम्मू-काश्‍मीरमधील सध्याच्या स्थितीचा ठपका त्यांनी कॉंग्रेसवर ठेवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहा येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. देशाला विविध सुरक्षाविषयक मुद्दे भेडसावत आहेत. केवळ मोदीच देशाला सुरक्षा पुरवू शकतात. देशाला पुढे नेऊन जागतिक सत्ता बनवण्याची क्षमता केवळ मोदींमध्येच आहे. देशासाठी कठोर मेहनत करणारे मोदी दिवसाच्या 24 तासांतील 18 तास काम करतात. जगभरात ते लोकप्रिय आहेत. कॉंग्रेसची सरकारे 55 वर्षांत करू शकले नाहीत ते कार्य मोदी सरकारने करून दाखवले आहे, असे ते म्हणाले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवाद पसरवणारांच्या विरोधात योग्य वाटेल ती कारवाई करण्याची मुभा मोदींनी सुरक्षा दलांना दिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शहांनी विरोधकांच्या संभाव्य महाआघाडीची पुन्हा खिल्ली उडवली. महाआघाडीला तुमचा नेता कोण हा प्रश्‍न विचारून मी थकलो आहे. ते मला उत्तर देत नाहीत. आता जनतेनेच तो प्रश्‍न विचारावा आणि महाआघाडीच्या धोरणांबाबतही विचारणा करावी. महाआघाडीला नेता आणि धोरणेही नाहीत. अशाप्रकारची महाआघाडी देशाचे भले करू शकत नाही. घराणेशाहीचे राजकारण चालवणारे स्वत:च्या कुटूंबांचे आणि स्वत:चे राजकीय हित जपण्यासाठी एकत्र आले आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)