केवळ ओळखपत्रावर मिळणार फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडर

लखनौ (उत्तर प्रदेश): कोणत्याही कागदपत्रांशिवाय केवळ ओळखपत्र दाखवून आता एपपीजी सिलिंडर्स उपलब्ध होऊ शकणार आहेत. नोकरीसाठी वा शिक्षणासाठी परगावी राहणारांसाठी गॅस कंपन्यांनी ही खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधे नुसार फक्त आपले ओळखपत्र दाखवून 5 किलो वजनाचा, एलपीजीचा निळ्या रंगाचा सिलिंडर कोणालाही मिळू शकणार आहे.

राजधानी लखनौसह राज्यातील अन्य सर्व जिल्ह्यातही आता हा एलपीजी सिलिंडर मिळू शकणार आहे. त्यासाठी गॅस कंपन्यांकडे आपले नाव आणि पत्ता नोंदवला पाहिजे. या 5 किलो वजनाच्या फ्री सेल एलपीजी सिलिंडरसाठी 328 रुपये एवढी किंमत द्यावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्राहकांच्या सुविधेसाठी सरकार सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती आयओसीएलचे कार्यकारी संचालक एके गंजू यांनी दिली आहे. या योजने अंतर्गत मार्च 2020 पर्यंत8 कोटी एलपीजी कनेक्‍शनचे वितरण करण्याची योजना आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)