‘त्या’ घराण्याच्या चार पिढ्या देशातील जनतेला एकच आश्वासन देत आहेत : मोदींचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नवी दिल्ली येथे मै भी चौकीदार या कार्यक्रमास संबोधित करीत असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती हल्ला चढविला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किमान वेतन योजना जाहीर केली असून याद्वारे काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सरकार महिना १२ हजार रुपये देईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील ‘मै भी चौकीदार’ या कार्यक्रमातून काँग्रेस अध्यक्षांच्या या योजनेवर जहरी टीका केली.

मोदी म्हणाले, जर एखाद्या राजकीय पक्षाच्या चार पिढ्या देशातील जनतेला एकच आश्वासन पुन्हा पुन्हा देत असतील मात्र ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसतील तर त्या राजकीय पक्षाच्या विश्वासार्हतेबद्दल देशातील जनतेनेच निर्णय घ्यायला हवा.

https://twitter.com/ANI/status/1112338691534536704

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)