केवळ महिलांच्याच खात्यात जमा होणार ७२ हजार – काँग्रेस 

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी देशातील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाततर्फे एक महत्वाची दारिद्य्र निर्मूलन योजना जाहीर केली. त्या योजने अंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना किमान वेतन योजने अंतर्गत दरवर्षी ७२ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. परंतु, या योजनेचे पैसे घरातील गृहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याचा खुलासा काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी म्हंटले कि, २० टक्के गरीब कुटुंबाना दरवर्षी ७२ हजार रूपयांची मदत मिळणार आहे. ही योजना महिलाकेंद्रित असून हे पैसे गृहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहे. ही योजना शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांना लागू असेल. या योजनेतून देशातील पाच कोटी कुटुंबे म्हणजेच सुमारे पंचवीस कोटी लोक गरीबातून बाहेर काढले जाणार आहेत. आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावे कि, ते या योजनेचे समर्थन करतात का विरोध करतात?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी गरिबांच्या विरोधात आहेत. मोदींनी सर्वात आधी मनरेगा योजनेला विरोध केला. एनएसएसओचे आकडे सांगत आहेत कि, मोदी सत्तेत आल्यानंतर ४ कोटी नोकरीवर कुऱ्हाड कोसळली. तुमच्याद्वारे थोपविल्या गेलेल्या जीएसटीमुळे छोटे व्यवसाय बंद होत आहे, अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)