कोल्हापूर अर्बन बँकेवर ६८ लाखांचा ऑनलाईन दरोडा

कोल्हापुरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

कोल्हापूर – कोल्हापूरच्या दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ऑनलाईन गंडा घातला आहे. कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे खाते एचडीएफसी बँकेच्या शाहूपुरी शाखेत आहे. या बँक खात्यातून ऑनलाईनद्वारे 67 लाख 88 हजारांची रक्‍कम वेगवेगळ्या 34 खात्यांवर हस्तांतर झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीला आला आहे. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर मधील गंगावेस येथील ‘दी कोल्हापूर अर्बन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव खरोशी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध अपहार, फसवणूक, माहिती, तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरटीजीएस व एनईएफटी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करून, संशयिताने अर्बन बँकेला गंडा घालून फसवणूक केली आहे. शुक्रवारी सकाळी 11.05 ते दुपारी 2.28 या काळात ही घटना घडली.

दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती हे महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांमध्ये ही सर्व रक्कम ट्रान्सफर झाल्यामुळे, कोल्हापूर पोलिसांच्या सायबर क्राईम सोबतच मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम ची मदत घेतली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)