बॉलीवूड सेलेब्रीटींचा ‘कॅश फॉर ट्वीट’ घोटाळा

गतवर्षी पेटीएम संस्थेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून चर्चेचा विषय बनलेल्या कोब्रापोस्टद्वारे अशाच प्रकारचे आणखीन एक ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले आहे. कोब्रा पोस्टच्या या नव्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कोब्रापोस्टच्या पत्रकारांनी ३६ बॉलिवूड सेलेब्रिटीजना आगामी निवडणुकांच्या तोंडावर रोख रकमेच्या मोबदल्यात राजकीय पक्षांसाठी सोशल माध्यमांवर प्रचार करण्यास तयारी दर्शविताना कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे.

कोब्रापोस्टचे संपादक अनिरुद्ध बहाल ‘स्टिंग’ ऑपरेशनबाबत माहिती देताना

कोब्रा पोस्टने केलेल्या आरोपांमध्ये हे सेलिब्रिटीज केवळ ‘रोख रकमेच्या’ म्हणजेच काळ्या पैशाच्या मोबदल्यात असे कृत्य करण्यासाठी तयारी दर्शवत असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले आहे. कोब्रा पोस्टने एका पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती देताना सांगितले की त्यांच्याद्वारे ‘बॉलिवूड’शी संबंधित असलेल्या ३६ सेलिब्रिटीजना पैशांच्या मोबदल्यामध्ये सोशल माध्यमांवर प्रचार करण्यासाठी विचारणा केली असता, त्यांनी कोणताही विचार न करता असे करण्यास सहमत असल्याचे सांगितले. यापैकी बहुतेकांनी तर पैशांच्या मोबदल्यात बलात्कार आणि इतर वादाच्या मुद्द्यांवर देखील पक्षाची पाठराखण करण्यास तयार असल्याचे सांगितले.

कोब्रापोस्टद्वारे कैलास खेर, विवेक ओबेरॉय, सोनी सूद, जॉकी श्रॉफ, शक्ती कपूर, राखी सावंत, आमिषा पटेल, सुनी लिओनी या आघाडीच्या बॉलिवूड सेलिब्रिटीजचे स्टिंग ऑपरेशन केले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोब्रापोस्टद्वारे उघड करण्यात आलेल्या या स्टिंग ऑपरेशनच्या माहितीद्वारे बॉलिवूड सेलिब्रिटीजने सोशल माध्यमांवरील राजकीय पक्षांचा प्रचार कारण्यासंबंधित प्रत्येक संदेशासाठी २ लाख ते ५० लाखांची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)