प्रायोगिक पातळीवर आयओसीची घरपोच सेवा

चैन्नई – ऑनलाईन खरेदी प्रमाणात दररोज वाढ नोंदविली जात असताना आता डीझेल आणि पेट्रोलसारखे इंधन ग्राहकांना ऑनलाईन मिळू लागले आहे. इंडिअन ऑइल कॉर्पोरेशनने या इंधनाची घरपोच डिलिव्हरी देणारी सेवा सुरू केली असून त्याची सुरुवात चेन्नईतील कोलावूर पेट्रोल पंपापासून केली गेली आहे.

या संदर्भात एचपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक एम.के. खुराना म्हणाले, ही सेवा देण्यात काही अडचण नाही. गेल्या सप्टेंबरमध्ये होम डिलिव्हरी देण्याचा निर्णय घेतला गेला होता आणि आता इंडिअन ऑइलने इंधन तुमच्या दारात योजना सुरू केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सुरुवातीला ग्राहक किमान 200 लिटर ते कमाल 2500 लिटर इंधनासाठी ऑनलाईन ऑर्डर बुक करू शकणार आहे. हे इंधन त्याला घरपोच दिले जाईल. काही पेट्रोल पंप चालकांनी या योजनेला विरोध सुरू केला असून या योजनेमुळे आत्महत्या वाढतील अशी भीती व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)