शबरीमाला दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सुरु

केरळ- महिलांना केरळच्या शबरीमालात प्रवेश करण्यास परवानगी वाद सुरु असतांनाच केरळ सरकारने मंदिरातील दर्शन प्रक्रियेची तयारी सुरु केली आहे, येत्या नोव्हेंबर पासून मंदिरात उत्सव सुरु होणार आहे. 16 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत मंदिरमध्ये भव्य ‘मांडला’ पूजेचे आयोजन केले आहे. मांडला पूजेसाठी मंदिरातील दरवाजे पुन्हा एकदा उघडले जातील. यावेळी सबरीमाला मंदिरात भक्तांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी केरल सरकार ने ऑनलाइन पोर्टल www.sabrimalaq.com सुरु केले आहे. या ऑनलाइन पोर्टलद्वारे भक्त दर्शनासाठी टिकट बुक करू  शकणार

या पोर्टल विशेषता  म्हणजे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना मंदिरातील गर्दी आणि दर्शनास लागणाऱ्या वेळेची माहिती दिली जाईल. तसेच मंदिरातील गर्भगृहात किती लोक उपस्थित आहे आणि दर्शनासाठी निलक्कल पासून पंबा या ठिकाणी पोहचायला किती वेळ लागणार याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. टिकट 48 तासांसाठी वैध असेल. या पोर्टलच्या माध्यमातुन पोलिस शबरीमाला मंदिरातील श्रद्धालुना ट्रैक करू शकणार.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)