ऑनलाईनने 180 अर्ज दाखल; 855 अर्ज विक्री

नगर – महापालिका निवडणुकीत ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज भरणे अनिवार्य असून, ती प्रक्रिया किचकट असताना देखील सुमारे 180 अर्ज दाखल झाले आहेत. राजकीय पक्षाचे “एबी’ फॉर्म नसताना देखील काहींनी ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज दाखल करून ठेवले आहेत. एकच अर्ज ऑफलाईनपद्धतीने अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाला आहे. अद्यापपर्यंत सुमारे 855 अर्जांची विक्री झाली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, आम आदमी पक्ष यांच्यासह काही राजकीय पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत. राजकीय पक्षांकडून उमेदवार अर्ज जाहीर झाले असले, तरी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप झालेले नाही. ऑनलाईन अर्ज अनिवार्य असल्याने उमेदवारांनी ते भरून ठेवले आहेत.

-Ads-

नवीन उमेदवारांचा यात समावेश आहे. पहिल्या दिवशी 17, दुसऱ्या दिवशी 79, असे एकूण 96 अर्ज दाखल झाले होते. तिसऱ्या दिवशी 79 अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी सायंकाळ उशिरापर्यंत आणखी काही अर्ज दाखल झाले होते. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सुमारे 180 च्या वर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

महापालिका निवडणूक कार्यालयातून आतापर्यंत 855 अर्जांची विक्री झाली आहे. तिसऱ्या दिवशी माळीवाडी कार्यालयातून सुमारे 80, सावेडीतून 74, बुरूडगावमधून 20 आणि केडगाव कार्यालयातून सुमारे 50 अर्जांची विक्री झाली होती.

ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरलेले राजकीय कार्यकर्ते

शीला दीप चव्हाण, अश्‍विनी ढापसे, संगीता भोसले, सुमन गायकवाड, सारिका भुतकर, पराग मुथ्था, ज्ञानेश्‍वर काळे, योगेश चिपाडे, विद्या खैरे, रितेश गुगळे, रोहिणी संजय शेंडगे, दिलीप बारस्कर, मयुर बांगरे, वैशाली बनसोडे, कुमार वाकळे, ताराबाई शिंदे, निहाल शेख, नरेश चव्हाण, अक्षय खोलम, रिता भाकरे या राजकीय कार्यकर्त्यांनी ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)