कराड – वडोलीनिळेश्वर (ता. कराड) येथे दोन भावांची वादावादी सुरू असताना आलेल्या दोन चुलत भावांनी मारहाण केल्याने एकजण जखमी झाल्याची घटना 5 रोजी घडली. याबाबत जखमी संजय संपत भोसले यांनी तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय भोसले यांचा गाडीच्या चावीवरून त्यांचा भाऊ राजेंद्रशी वादावादी सुरू होती. यावेळी भांडणाचा आवाज ऐकूण शेजारील चुलत भाऊ बाबासो आण्णा भोसले व विजय आण्णा भोसले हे घराबाहेर आले.
यावेळी संजय भोसले यांची भावजयने भांडणे करून गावाला तमाशा दाखवू नका असे म्हंटल्याचा राग आल्याने बाबासो भोसले व विजय भोसले यांनी राजेंद्रला शिवीगाळ व मारहाण केली. त्यास सोडवण्यासाठी गेले असता विजय भोसले याच्या हातातील कुऱ्हाड संजय भोसले यांच्या हाताच्या बोटाला लागल्याने ते जखमी झाले. अधिक तपास पोलिस करीत आहेत.