तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – औरंगाबाद मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. औरंगाबाद मधील खुलताबाद येथे ही घटना घडलेली असून कागजीपुरा येथील तलावात हे तरुण पोहण्यासाठी गेले होते. नसीम मुबीन खान (वय १८) असे मृत तरुणाचं नाव आहे. ही घटना दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घडलेली आहे. उन्हाळा वाढल्याने नसीम आणि त्याचे दोन मित्र तलावात पोहण्यासाठी गेले असताना नासिम पाण्यात बुडाल्याने, त्याच्या इतर मित्रांनी आरडा-ओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थ धावून आले पण तोपर्यंत त्याचा उशीर झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)