मुंबई – ‘वायू’ चक्रीवादळामुळे मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे मुंबईत चर्चगेट स्टेशनवरचं होर्डिंग कोसळलं. यामध्ये एकाचा मृत्यु तर दोनजण जखमी झाले आहेत. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव मधुकर नार्वेकर (वय 62 वर्षे) आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
Western Railway: One person died and 2 people were injured after aluminium cladding panel on the east side facade of Churchgate new station building fell today, due to strong winds & rains. Matter to be investigated.
— ANI (@ANI) June 12, 2019
मुंबईत जोरदार वारे आणि पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकलं असलं तरी मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.